*मराठा समाजाची समाज जागृती चौथी मोहीम टोप गावांत*
*कोल्हापूर (मोहन शिंदे युवा मराठा न्युज)*
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. राज्यभर आरक्षणा विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवली जात आहे .
सर्व प्रथम मराठा आरक्षणासाठी शहीद झालेला बीड जिल्ह्यातील विद्यार्थी विवेक रहाने याच्या आत्म्यास चिरशांती लाभण्यासाठी टोप गावातील मोहीमेत मराठा समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
आणि अशा प्रकारची टोकाची भुमिका मराठा युवकाने घेऊ नये असे मत व्यक्त करून आपण आत्महत्या करून आपला प्रश्न सुटणार नाही याकरिता आपण आरक्षणाच्या विरोधात लढा द्यायची गरज आहे.
तसेच आजची मोहीम हातकणंगले तालुक्यातील टोप गावांतील मराठा समाजाचे अभ्यासक श्री. मिलींद कुशिरे लाईव्ह मराठी पत्रकार , श्री दौलत पाटील , राम पाटील , ओंकार भाट ,सुरज पाटील ,
यावेळी पेठ वडगांवचे विजयसिंह शिंदे यांनी आपल्या मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज आहे.
मराठा समाजाचे अभ्यासक पुंडलिक बिरंजे आळते , हनुमंत पाटील सावर्डे ,विजयसिंह शिंदे वडगांव , प्रल्हाद पाटील घुणकी ,
प्रविण खोपकर किणी , मच्छिंद्र पाटील पारगांव , गोरख शिंदे वाठार , सयाजी पाटील चावरे , रविद्रं खाडे सावर्डे , सुहास जाधव ,प्रभाकर कुरणे , बाळासाहेब पाटील पारगांव , संताजी माने किणी , विवेक पाटील भादोले , इत्यादी मराठा समाज अभ्यासक उपस्थित होते.
“एक मराठा लाख मराठा”
” छत्रपती शिवाजी महाराज की जय” “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ” यावेळी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी टोप गावांतील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.