• Home
  • चौकटपाडेत आमदारांच्या कामांचे भुमिपुजन संपन्न

चौकटपाडेत आमदारांच्या कामांचे भुमिपुजन संपन्न

चौकटपाडेत आमदारांच्या कामांचे भुमिपुजन संपन्न निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- दिनांक २९/०९/२०२० रोजी मौजे चौकटपाडे येथे आपले लाडके आमदार साहेब मा.श्री.सुहास(आण्णा) कांदे यांचे पुतणे व तामसवाडी येथील सरपंच मा.श्री.धनंजय(बाळू)आप्पा कांदे व मालेगाव शिवसेना तालुका प्रमुख मा.श्री.पंकज(दादा) निकम यांच्या उपस्थितीत गावाची गरज किंवा गावांतर्गत कामापासून वंचित असलेल्या कामासाठी आमदार साहेबांच्या निधीतून गावात सभामंडप चे भुमीपूजन करण्यात आले त्यावेळी चौकटपाडे येथील सरपंच श्री. अनिरुध्द किसन पारखे,श्री.विठोबा(माऊली)शेवाळे,श्री.रमेश शेवाळे,चौकटपाडे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.आमदार साहेबांच्या गैरहजेरीत माजी पंचायत समिती सदस्य श्री.रमेश शेवाळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी आण्णांचे मंजुर करुन दिलेल्या कामबद्दल आभार मानले.

anews Banner

Leave A Comment