• Home
  • *🛑 जे. जे.मध्ये सुरूय भोंगळ कारभार 🛑*

*🛑 जे. जे.मध्ये सुरूय भोंगळ कारभार 🛑*

*🛑 जे. जे.मध्ये सुरूय भोंगळ कारभार 🛑*

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 1 ऑगस्ट : ⭕ जेजे हॉस्पिटल हे कोव्हिड पेशंटवर उपचार करण्यासाठी ओळखले जाते. इथल्या काही कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यातून ते मात करून आले आहे. सध्या तिथल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टाफ नर्स आणि ट्रान्झिस्ट वॉर्ड रोटेशन पध्दतीने नियुक्त केले आहेत.

या स्टाफ नर्ससाठी ट्रान्झिस्ट प्रभागात 15 दिवसांची पोस्टिंग पूर्ण करावी लागते. जवळपास जे. जे. हॉस्पिटलमध्ये 1200 कर्मचारी आणि परिचारिका आहेत. परंतु त्यातल्या फक्त काही परिचारिकांसाठी ट्रान्झिस्ट वॉर्ड रोटेशन सुरू आहे, मग बाकींच्यांसाठी काय? असा प्रश्न सहाजिकच समोर येत आहे. हा ट्रान्झिस्ट वॉर्डची एका महिन्यानंतर किंवा 40 दिवसांत पुनरावृत्ती होत असते. मात्र या ट्रान्झिस्ट वॉर्डचे रोटेशन हे 5 ते 6 महिन्यांनंतर यावे, अशी इथल्या अनेकांची मागणी आहे.

हे ट्रान्झिस्ट वॉर्ड जेजे द्वारेच नियुक्त केले जातात. मात्र तरीसुध्दा कर्मचारी परिचारिकांना ४५ दिवसांच्या आत पुन्हा पोस्टिंग का करावी लागते, हा मोठा प्रश्न आहे, इथे काम करणाऱ्या अनेकांच्या समोर उभा आहे.

या सगळ्यात भर म्हणजे टिटवाळा, बदलापूर आणि ठाणे येथून जाणाऱ्या बस संध्याकाळ आणि रात्रीच्या शिफ्टसाठी रद्द करण्यात येत आहेत. काही ठिकाणी कंटेनमेंट झोनदेखील आहेत. त्यामुळे बऱ्याच नर्सेसना कंटेनमेंट झोनप्रमाणे प्रवास करणे अवघड होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन किंवा राज्य शासनाने परिचारिकांसाठी कमीतकमी प्रवासाचा पर्याय शोधला पाहिजे, असंदेखील इथल्या सर्रास कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, मात्र तशा कोणत्याही सुविधा इथल्या कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत.⭕

anews Banner

Leave A Comment