• Home
  • *हस्ते व मनखेड केंद्र ता. सुरगाणा येथे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*हस्ते व मनखेड केंद्र ता. सुरगाणा येथे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*हस्ते व मनखेड केंद्र ता. सुरगाणा येथे मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप* (युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड )
हस्ते व मनखेड केंद्र ता. सुरगाणा येथील जि. प. शाळांमध्ये इयत्ता पहिलीतील ११०विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्याय पुस्तिका व लेखन साहित्याचे वाटप *आमास सेवा ग्रुप, मुंबई माध्यम लायनेस क्लब ऑफ जुहू रोड अध्यक्ष मा.छायाताई पारेख व सचिव पुष्पाताई अग्रवाल* यांच्या सौजन्याने रोंघाने, जाहुले, वांगणपाडा, कळमने, कचरुपाडा, भेगु, बर्डा, जांभुळपाडा, बिजूरपाडा, येथील शाळांमध्ये या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोविड १९च्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु… या उपक्रमांतर्गत आमास सेवा ग्रुप चे मा. विजय भगत व मा. चंद्रकांत देढिया यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक शिक्षक हरिश्चंद्र भोये व धनंजय भोये सराड यांच्या सहकार्याने सर्व नियमांचे पालन करत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
ऑनलाईन /ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी सुद्धा आवडीने शिक्षण घेतात. याच विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून आमास सेवा ग्रुप मुंबई, माध्यम लायनेस क्लब ऑफ जुहू रोड यांच्याकडून भरपूर असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मा. नम्रता चंद्रकांत देढिया यांच्या जन्मदिनानिमित्त विद्यार्थ्यांना केळी, बिस्कीट वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रा.शिक्षक धनंजय भोये, विष्णू धूम, भास्कर बागुल, रोंघाणे येथिल पो.पा.मनोहर भोये, यांच्या सोबत या भागातील अनेक शिक्षणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नईम. मन्यार यांनी केले व धनंजय भोये यांनी आभार व्यक्त केले.

anews Banner

Leave A Comment