Home Breaking News मोफत रेशन घेण्यासाठी…..! लागणार नाही रेशनकार्ड :-  सरकारने बदलले नियम

मोफत रेशन घेण्यासाठी…..! लागणार नाही रेशनकार्ड :-  सरकारने बदलले नियम

105
0

🛑 मोफत रेशन घेण्यासाठी…..! लागणार नाही रेशनकार्ड :-
सरकारने बदलले नियम 🛑✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕रेशन कार्डला आधार लिंक करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. मोदी सरकार या दिशेने काम करत आहे. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर ग्राहकांना रेशन दुकानांवर रेशनकार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही. रेशनकार्ड क्रमांकासह दुकानदार धान्याचा वाटा ग्राहकांना देईल. लॉकडाउनची अंमलबजावणी केल्यानंतर केंद्र सरकारने रेशनकार्ड नसलेल्या अशा लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. दिल्लीसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या आदेशाचे अनुसरण करीत रेशनचे विनामूल्य वितरण करीत आहेत. ही योजना पहिले तीन महिन्यांसाठी लागू केली गेली, परंतु नंतर केंद्र सरकारने त्यास नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, असे असूनही त्या लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळी दिली जात आहेत, परंतु सरकारची ही योजना केवळ नोव्हेंबरपर्यंतच आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यानंतरही ज्या लोकांना रेशनकार्ड आधारशी जोडले गेले आहे त्यांना रेशन कार्ड नसतानाही रेशन मिळणार आहे..

पंतप्रधान मोदींनी 30 जून 2020 रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात, देशातील सण आणि आगामी काळात होणाऱ्या उत्सवांचा विचार करता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKY) पुढील 5 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याअंतर्गत, देशातील 80 कोटीहून अधिक NFSA लाभार्थी दरमहा पात्रतेव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो हरभरा प्रदान करत आहेत….⭕

Previous article🛑 विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली….! शरद पवारांची भेट 🛑
Next article🛑 एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here