• Home
  • 🛑 एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर 🛑

🛑 एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर 🛑

🛑 एमपीएससी दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जाहीर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 29 सप्टेंबर : ⭕ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सोमवारी MPSC 2020 परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड जाहीर केले. उमेदवारांना याhttp://www.mpsc.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. यासाठी उमेदवारांना आपलं लॉगइन करावं लागेल.

एमपीएससी दुय्यम सेवा (गट ब) पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ३ मे २०२० रोजी होणार होती. मात्र करोना प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली होती.

➡️ एमपीएससी दुय्यम सेवा परीक्षा २०२० प्रवेश पत्र डाऊनलोड कसे कराल?

1) ‘MPSC Subordinate Services (Group B) Prelims Admit Card 2020’ या पर्यायावर क्लिक करा.

2) त्यानंतर लॉगइन करा. एक नवी विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तेथे ‘My Account Section’ दिसेल, तेथे क्लिक करा.

3) कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टॅब चेक करा आणि तुमचं वर्ष आणि एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०२० निवडा.

4) आता तुमच्या स्क्रीनवर अॅडमिट कार्ड दिसेल. ते डाऊनलोड करा आणि पीडीएफ सेव्ह करा आणि प्रिंटआउट घ्या. परीक्षेच्या वेळी हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड सोबत बाळगा.’⭕

anews Banner

Leave A Comment