*आमच्या दैवता विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही,*
*मंत्री अनिल परब *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
आमचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आमच्या दैवताबद्दल कोणीही काहीही बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी खासगी चॅनेलशी बोलताना आज दिला.
नौदल अधिकाऱ्यांला झालेल्या मारहाणीच्या संदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, ही शिवसैनिकांची उस्त्फुर्त प्रतिक्रीया होती.
नौदल अधिकारी आहे म्हणून संयम तोडण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी केला. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. दैवताला कोणी काही बोलले आणि आम्ही सत्तेत बसलो आहे म्हणून बोलायचे नाही का असा प्रतिप्रश्नही केला.
कंगना राणावतने मुंबईच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने तिथेच रहावे. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपले बस्तान तिने उचलावे हेच योग्य ठरेल. कंगना राणावतच्या आँफीसच्या बेकायदा बांधकामाकर पालिकेने केलेली कारवाई व राज्यपालांची घेतलेली भेट यावरील प्रश्नाला उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, महापालिकेने बेकायदा कामावर बांधकामावर कारवाई केली. राज्यपाल त्यांना केळ देत असतील तर राज्यपालांनी इतरांनाही भेटले पाहिजे. विचारपूस केली पाहिजे.