*भाजपमध्ये आन्याय होत असल्याने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
कांदीवली (मुंबई ) येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भाजपमध्ये होणारा अन्याय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळेच शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले.
कांदिवली विभागात शिवसेना विभाग क्रमांक – २ च्या माध्यमातून नियमितपणे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय कोरोनाकाळापासून शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. अनेक ठिकाणी मोफत धान्य वाटप करण्यात आले. घरोघरी तपासणी, सॅनिटायझेशन, शिवसेना शाखामधून औषध वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या कामांमुळे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या पक्ष प्रवेशासाठी शाखाप्रमुख अनंत नागम, उपशाखाप्रमुख लल्लन राव यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. यावेळी विनोद यादव, राहुल यादव यांच्यासह विभाग २ चे उत्तर भारतीय जिल्हाप्रमुख ऍड. कमलेश यादव, उपविभागप्रमुख राजुभाई खान, राजन निकम, शाखा समन्वयक संजय साळवी, उपशाखाप्रमुख रवि राऊळ, आनंदा आमते, विजय मालुसरे, अशोक परब, संदिप पवार, रोहीत यादव यांच्यासह शाखेतील पदाधिकारी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.