• Home
  • 🛑 चिंता सोडा….! वाँटसप मधून डिलीट झालेले फोटो अन व्हिडीओ पुन्हा परत मिळवता येणार 🛑

🛑 चिंता सोडा….! वाँटसप मधून डिलीट झालेले फोटो अन व्हिडीओ पुन्हा परत मिळवता येणार 🛑

🛑 चिंता सोडा….! वाँटसप मधून डिलीट झालेले फोटो अन व्हिडीओ पुन्हा परत मिळवता येणार 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली -⭕ बर्‍याचदा आपल्याकडून व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले महत्त्वाचे फोटो आणि व्हिडीओ अनवधानाने डिलीट केले जातात. त्यानंतर आपल्याला स्वत:चाही राग येतो. आपल्याला हे फोटो किंवा व्हिडीओ परत मिळवता येत नाहीत. मात्र आता चिंता सोडा, व्हॉट्सअ‍ॅपवरून फोटो आणि व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर ते पुन्हा मिळवता येणं शक्य आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमधील हा डेटा ३० दिवसांच्या आत तुम्ही पुन्हा डाऊनलोड करु शकता. मात्र १ महिन्याच्या कालावधीनंतर हा डेटा व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हरवरून गायब होतो.डिलीट केलेले फोटो पुन्हा परत कसे मिळवाल?

जर युजर्सने संपूर्ण चॅट डिलीट केले नसेल तर फोटो पुन्हा डाऊनलोड करु शकतात. यासाठी, आपल्याला चॅट ओपन करुन त्या फोटोपर्यंत स्क्रोल करावे लागेल जो आपल्याला हवा आहे. त्यानंतर आपण तो फोटो किंवा व्हिडिओ पुन्हा डाऊनलोड करू शकता. हे लक्षात ठेवा की, फोटो डिलीट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत फोटो आणि व्हिडिओ परत घेतले जाऊ शकतात.

आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा फोटो डाऊनलोड करताना एक एरर मेसेज येतो जो ‘डाउनलोड करू शकत नाही, ज्यात असा संदेश येतो की, जेव्हा असा संदेश येतो तेव्हा फोनवर इंटरनेट कनेक्शन सुरु आहे की नाही हे आपल्याला पाहावे लागेल.

त्याचसोबत फोनमधील डेटाही चेक करुन घ्यावा लागेल. डेटा बंद असल्यास व्हॉट्सअ‍ॅप सर्व्हरशी संपर्क साधणे कठीण आहे. काही वेळा फोनमध्ये स्टोरेज भरलेले असतानाही व्हॉट्सअ‍ॅपवर Error येतो….⭕

anews Banner

Leave A Comment