• Home
  • 🛑 बदल्यांचा घोळ संपेना…..!पोलिसांच्या बदल्यांना सात सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ 🛑

🛑 बदल्यांचा घोळ संपेना…..!पोलिसांच्या बदल्यांना सात सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ 🛑

🛑 बदल्यांचा घोळ संपेना…..!पोलिसांच्या बदल्यांना सात सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ राज्य सरकारने पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ दिली असून ती आता सात सप्टेंबरपर्यँत वाढविण्यात आली आहे. पोलिसांच्या बदल्यावर राज्य सरकारमधील तीनही पक्षांत वाद पेटला असताना या बदल्यांना विलंब होत असल्याची चर्चा आहे. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त कडक ठेवावा लागत असल्याने बदल्यांची मुदतवाढ सात सप्टेंबरपर्यँत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या बदल्यावरून राज्यात बरेच राजकारण शिजले. यावर निर्णय घेण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांची बैठकही पार पडली. त्यातून अनेक नावांवर चर्चा झाल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या आणि इतर बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दुसरीकडे आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही गोंधळ सुरू आहे. दोन महिन्याच्या आत दोन सनदी अधिकार्‍यांची दोनदा बदली करण्यात आली आहे .यामध्ये अनुप कुमार यादव यांची अवघ्या वीस दिवसात दुसऱ्यांदा बदली केली आहे .23 जुलै रोजी अनुप कुमार यादव यांची आरोग्य खात्यातून विक्रीवर विभागात बदली झाली होती तर आज 13 ऑगस्ट रोजी विक्रीकर विभागातून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे.

तर विनिता सिंघल यांची 20 जून रोजी फिल्म सिटी इथून आदिवासी विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली केली गेली होती . त्यानंतर दोन महिन्यांच्या आत त्यांची बदली कामगार विभागात झाली आहे. याआधी दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या तीन दिवसात रद्द करण्यात आल्या होत्या. आता IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ समोर आला आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment