Home कोकण ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया – सुहास...

ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया – सुहास खंडागळे 🛑

94
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी बीएएमएस,बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी दया – सुहास खंडागळे 🛑
✍️देवरुख 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी/देवरुख:-⭕गाव खेड्यात वाढता कोरोना लक्षात घेता व रुग्णांनी आजार अंगावर काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी खासगी ओपीडी डॉक्टरांना योग्य ते धोरण ठरवून या आजारावरील उपचारांची परवानगी देण्यात यावी,जेणेकरून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होईल आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल,असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत ग्रामीण भागातील लोकांत अधिक प्रमाणात निर्माण झाली असून आरोग्य यंत्रणा,ग्रामपंचायत आणि दक्षता कमिटी यांनी लोकांचे आजाराबाबत प्रबोधन करणे गरजेचे असून कोणत्याही आजाराच्या रुग्णाला प्राथमिक टप्प्यात उपचार मिळणे आवश्यक आहे असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.सर्दी,वातावरण बदला मुळे होणाऱ्या आजाराकडे देखील भीती मुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने लोकांनी समोर येऊन उपचार घ्यायला हवेत असे वातावरण निर्माण व्हायचे असेल तर रुग्णांच्या फॅमिली डॉक्टरांना कोरोना उपचाराची परवानगी मिळायला हवी असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.बीएएमएस व बीएचएमएस हे वैद्यकीय क्षेत्रातील मोठे तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ आहे.त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे खंडागळे यांनी म्हटले आहे.

एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण असताना,डॉक्टरांची कमतरता भासत असताना आणि रुग्णांना बेड मिळणे काही ठिकाणी अडचणीचे होत असताना गाव खेड्यात आरोग्य सेवा देणारे तसेच निमशहरी भागात खासगी ओपीडी चालविणारे बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांना कोरोना बाधित रुग्णांची तपासणी व उपचार पद्धती योग्य ती काळजी घेऊन करण्यास परवानगी द्यायला हवी.

असे केल्यास सौम्य लक्षणे असणाऱ्या व होम आयसोलेशन मध्ये राहणारे पेशंट हे घरच्या घरी बरे होतील व त्यांच्यात भीतीचे वातावरण राहणार नाही असे मत सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत विचार करावा,डॉक्टरांच्या संघटना व प्रतिनिधींशी बोलावे असेही सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे..⭕

Previous articleशिवसेनेच्या वतीने उलवे शहरात रविवार दिनांक २ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next articleसेवानिवृत्त मुख्याध्यापक कै.लक्ष्मणराव धोंडीबाराव कोटगिरे त्यांचे अल्पशा आजाराने निधन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here