• Home
  • 🛑🩸 *मालगुंड येथे…..! छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑

🛑🩸 *मालगुंड येथे…..! छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑

🛑🩸 *मालगुंड येथे…..! छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी/मालगुंड :⭕ *छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ,जिल्हा परिषद सदस्या सौ.साधनाताई साळवी,पंचायत समिती सदस्य श्री.गजानन पाटील साहेब,प्रा.आरोग्य केंद्र मालगुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वाईकर सर,PSIअस्मिता पाटील मॅडम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब,कार्यध्यक्ष श्री.संतोषजी आग्रे साहेब आणि सचिव श्री.समीर गोताड साहेब यांनी केले.*
*रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सदस्य श्री.मुकेश धावडे आणि केशव शिवगण यांनी विशेष प्रयत्न केले.*

*श्री.नितीन सूर्यकांत रोडे*
*(मीडिया प्रमुख – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी)*…⭕

anews Banner

Leave A Comment