• Home
  • 🛑 “सप्तशृंगी मंदिराचे” दार उघडा….! नाहितर गाव दत्तक घ्या – संस्थांनाची विनवणी 🛑

🛑 “सप्तशृंगी मंदिराचे” दार उघडा….! नाहितर गाव दत्तक घ्या – संस्थांनाची विनवणी 🛑

🛑 “सप्तशृंगी मंदिराचे” दार उघडा….! नाहितर गाव दत्तक घ्या – संस्थांनाची विनवणी 🛑
✍️नाशिक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक / वणी :⭕ चार महिने उलटूनही आदिमाया सप्तशृंगी मंदिराचे दार भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने आणि पर्यायाने गडावरील सर्व अर्थचक्र बंद झाल्यामूळे गडावरील व्यावसायिक व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने किंवा देवस्थान संस्थानने गाव दत्तक घ्यावे अथवा मंदिर किंवा पहिली पायरीवर भाविकांना दर्शनासाठी परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी सप्तशृंगी गडावरील व्यापारी वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका..

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय पहिल्या लॉकडाऊन दरम्यान केंद्र व राज्यशासनाने घेतला होता.

त्यात गडावरील चैत्रोत्सव यात्राही रद्द झाल्याने गडावरील व परीसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान केंद्रशासनाने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनेक गोष्टी शिथील केल्या यात रेड झोन आणि कंन्टेनमेंट झोन सोडून अन्य भागातील सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे 8 जूननंतर सुरू करण्यास परवानगी दिली.

मात्र महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांबरोबरच पर्यटन व धार्मिक स्थळांवर अवलंबून असलेल्या उद्योग धंदे बंदच आहे.⭕

anews Banner

Leave A Comment