• Home
  • 🛑 पोटासाठी रस्त्यावर आजीच्या ‘करामती’; मदतीसाठी धावला रितेश देशमुख 🛑

🛑 पोटासाठी रस्त्यावर आजीच्या ‘करामती’; मदतीसाठी धावला रितेश देशमुख 🛑

🛑 पोटासाठी रस्त्यावर आजीच्या ‘करामती’; मदतीसाठी धावला रितेश देशमुख 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 25 जुलै : ⭕ करोना व्हायरसचा विळखा काही केल्या कमी होत नाहीये. अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अवस्था अजून बिकट झाली आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. तर अनेकजण छोटं- मोठं काम करून कुटुंबाचं पोषण करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सात अनाथ नातींना सांभाळण्यासाठी वयाच्या चक्क ८५ वर्षाच्या एका वृद्ध महिलेला लाठी काठीचा खेळ दाखवून पोट भरायची वेळ आलेली आहे. तरुणपणी अनेक चित्रपटांमध्ये धडकलेल्या शांताबाईंनी सीता और गीता, त्रिशूल व शेरणी या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र वेळ कोणावरही येऊ शकते हे न विसरता जिद्दीने आपल्यामधील लाठी काठी फिरवण्याची कला, रस्त्यावर चौका चौकात सादर करून नागरीकांचे मनोरंजन करून हक्काने दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नऊवारी साडी नेसलेल्या आजी करामती करत आहेत. पैशांसाठी आणि पोटाच्या खळगीसाठी त्यांना या वयातही करामती दाखवण्याची कामं करावी लागत आहेत. पण आजीची जिद्द आणि मेहनत पाहून अनेकांना तिचा अभिमानच वाटला. प्रत्येकजण सोशल मीडियावर तिला ‘वॉरिअर आजी मां’ या नावानेच संबोधत आहे.

आता या आजीच्या मदतीसाठी रितेश सरसावला आहे. त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना आजीचा संपर्क कोणाला कुठे होतो का विचारले. अवघ्या थोड्या वेळातच रितेशला आजींचा संपर्क मिळाला. आता रितेश आजीला कोणत्या पद्धतीने मदत करतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

रितेशशिवाय सोशल मीडियावरील अनेक लोक आजीच्या टॅलेन्टचं कौतुक करत आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे सल्लेही दिले जात आहेत. यासोबतच चाहते रितेशचंही भरभरून कौतुक करत आहेत.

शांताबाई पवार ( आजी ) या हडपसर वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुले व सुना मरण पावल्यानंतर त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. काबाड कष्ट करून ३ मुलींचे लग्न केले,आता १४ जणांचा त्या सांभाळ करत आहेत. यामधील काही हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आजी स्वतः करतात, मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचे संकट आले आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबाची उपासमारी सुरू झाली.

अनेक दिवस पाच मुलींसह आजी उपाशी झोपल्या आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही, शेवटी लॉकडाऊन उठल्यानंतर आजीने काठी फिरवण्याची कला अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करत नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे, अनेकांनी आजीला सोशल मिडियावर व्हायरल करून आजीच्या कलेचे लाखो नागरिकांनी कौतुक केले.⭕

anews Banner

Leave A Comment