• Home
  • नांदेड मध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना बाधित तर अनेक अधिकारी विलगीकरणात –

नांदेड मध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना बाधित तर अनेक अधिकारी विलगीकरणात –

नांदेड मध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना बाधित तर अनेक अधिकारी विलगीकरणात –
नांदेड, दि. २१ ; राजेश एन भांगे

पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे काही दिवसांपूर्वीच कोरोना मुक्त झाले आहेत. त्यात आता त्यांच्या निकटवर्तीय आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी यासह अनेक अधिकाऱ्यांना आता घरीच विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन विकास कामे त्याच बरोबर कोरोनाचा आढावा घेणे सुरू आहे. शनिवारी दुपार पर्यंत अनेक विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला चव्हाण यांचे निकटवर्तीय विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांची ही पूर्णवेळ उपस्थिती होती. दरम्यान सोमवारी राजूरकर हे कोरोना बाधित आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बैठकीला उपस्थित अनेक अधिकाऱ्यांची आता कोरोना तपासणी होणार आहे. तर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांना आता विलगी करणात राहण्याची वेळ आली आहे. नांदेड मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने 23 जुलै पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अंमल बजावणी करणारे अधिकारीच आता अडचणीत आले आहेत.

anews Banner

Leave A Comment