Home Breaking News नांदेड जिल्ह्यात आज ३२ बाधितांची भर तर कोरोनातून आज ४० रूग्ण बरे...

नांदेड जिल्ह्यात आज ३२ बाधितांची भर तर कोरोनातून आज ४० रूग्ण बरे व दोनजणांचा मृत्यू –

87
0

नांदेड जिल्ह्यात आज ३२ बाधितांची भर तर कोरोनातून आज ४० रूग्ण बरे व दोनजणांचा मृत्यू –
नांदेड,दि. २१ ; राजेश एन भांगे

जिल्ह्यात आज रोजी सायं. 5 वाजे पर्यंतच्या अहवाला नुसार 32 व्यक्ती बाधित झाले. तर 40 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 134 अहवालापैकी 98 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 18 एवढी झाली असून यातील 555 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 411 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे.

सोमवार 20 जुलै रोजी आंबेडकरनगर येथील 27 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना तर मंगळवार 21 जुलै रोजी रहेमतनगर येथील 69 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 44 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 40 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1, बिलोली कोविड रुग्णालयातील 3, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1, मुदखेड कोविड केअर सेंटर येथील 5, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2 तसेच खाजगी रुग्णालयातील 14 बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 555 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपसणी प्रक्रियेद्वारे नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 49 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष व 71 वर्षाची 1 महिला, फत्तेबुरुज किल्ला रोड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, आनंदनगर नांदेड येथील 45 व 80 वर्षाचे दोन पुरुष, सोमेश कॉलनी येथील 95 वर्षाची 1 महिला, निजाम कॉलनी नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष, वाडी नांदेड येथील 27 वर्षाची 1 महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 71 वर्षाची 1 महिला, स्त्री रुग्णालय नांदेड येथील 29 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 55 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील रावी येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका येथील 30 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 39 वर्षाचा 1 पुरुष,
देगलूर तालुक्यातील सीईओ निवासस्थान परिसर 44 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर लाईन गल्ली येथील 13,13,20,20,48 वर्षाचे 5 पुरुष, देगलूर मरखेल पोलीस स्टेशन येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील भायेगाव रोड येथील 21 वर्षाची 1 महिला, देगलूर नोगाबा मंदिर येथील 15 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील शेलगाव येथील 23 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील कोटेकल्लुर 5, 10, 48 वर्षाचे 3 पुरुष, देगलूर तालुक्यातील भुतन हिप्परगा येथील 35 वर्षाचा 1 पुरुष व परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील 54 वर्षाचा 1 पुरुष आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 55 वर्षाचा 1 पुरुषांचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात 411 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 87, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 141, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 13, जिल्हा रुग्णालय येथे 28, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 10, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 41, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 23, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 12, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 39 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 287
घेतलेले स्वॅब- 10 हजार 662,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 596,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 32
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 18,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
मृत्यू संख्या- 44,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 555,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 411,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 302.

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous article*एस.टी.कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती लागू करा.*
Next articleनांदेड मध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना बाधित तर अनेक अधिकारी विलगीकरणात –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here