Home Breaking News 🛑 ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’ 🛑 मुंबई ( साईप्रजित...

🛑 ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’ 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

85
0

🛑 ‘भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य’ 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 जुलै : ⭕ कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आली, की भारतात कोरोना व्हायरसवरील लस येत्या १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आयसीएमआरचे डायरेक्टर डॉ. भार्गवा यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर टोपे यांनी ही शक्यता वर्तवल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात कोरोनावर लस तयार झाली असल्याचे समोर आले होते. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र, ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच होती. त्यानंतर ही लस १५ ऑगस्ट रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणणं हे शक्य नाही, असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं होते. मात्र, भारतात कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. देशात २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक २८ हजार ७०१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ७८ हजार २५४वर पोहोचला असून मृतांचा आकडा २३ हजार १७४ झाला आहे. तसेच सध्या ३ लाख १ हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत ५ लाख ५३ हजार ४७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.⭕

Previous article🛑 माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील “शनया”..! पुन्हा एकदा बदलणार…ही अभिनेत्री साकारणार “शनया” 🛑 ✍️चंदेरी दुनिया :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleयुवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे    पुणे 14 जुलै राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या पुणे हावेली तालुका अध्यक्ष पदी बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here