Home Breaking News माऊली निघाली पंढरीला.. ✍️ आळंदी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा...

माऊली निघाली पंढरीला.. ✍️ आळंदी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

161
0

🛑 माऊली निघाली पंढरीला.. 🛑
✍️ आळंदी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

आळंदी (पुणे) :⭕आकर्षक फुलांनी सजविलेली लाल परी…माउली नामाचा गजर..अन् पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा तब्बल सतरा दिवसांचा आजोळघरातील मुक्काम उरकून आज आषाढ शुद्ध दशमीला चल पादुकांसह मोजक्या वारक-यांच्यासमवेत दुपारी दीडच्या सुमारास पंढरीकडे मार्गस्थ झाला. जड अंतकरणाने आळंदीकरांनी माउलींना भावपूर्ण निरोप आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीसाठी दिला.

कन्या सासु-यासी जाये
मागे परतोनी पाहे
तैसे जाले माझ्या जिवा
केव्हा भेटसी केशवा. अशीच अवस्था आज वारक-यांची होती. गेली सतरा दिवस माऊलींच्या पादुका आजोळघरात होत्या.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दर्शनाला बंदी होती. आज आषाढ शुद्द दशमी आणि उद्या आषाढी एकादशी असल्याने पंढरपूरात जाण्यासाठी लगबग होती. अवघ्या वीस लोकांना वारीसाठी परवानगी होती. पहाटे माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा आणि दुधारती केली. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान नैवद्य दाखविण्यात आला.मग सुरू झाली लगबग ती पंढरीकडे जाण्यासाठी. पादुका घेवून जाण्यासाठीची लालपरी आकर्षक फुलांनी सजविलेली होती.

पालखी मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या होत्या. दुतर्फा घऱातून तसेच गॅलरीतून आळंदीकर माउलींच्या दर्शनासाठी उभे होते. दुपारी एक वाजता कर्णा वाजल्यानंतर पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात माउलींच्या पादुका घेत बसचे दिशेने निघाले. आणि माउलीनामाचा गजर झाला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रांताधिकारी संजय तेली, बाळासाहेब चोपदार उपस्थित होते. आजोळघरातून माउलींच्या पादुका बाहेर आणल्यानंतर उपस्थित ग्रामस्थ आणि वारक-यांनी पुंडलिका वरदे हरि विठ्ठलचा गजर करत माऊलींच्या पादुका बसमधे नेल्या आणि बस पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान पुणे सासवड जेजुरी मार्गे पालखी सोहळा वाखरी येथे जाणार आहे. त्यानंतर संतांच्या क्रमवारीनुसार परंपरेने पंढरपूरात प्रवेश करतील.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पायी वारी सोहळा राज्य शासनाने रद्द केला. हा निर्णय जड अंतकरणाने वारक-यांनी स्विकारला. प्रत्येकाने घरिच बसून माउलींचे नामस्मरण करत शासनाच्या निर्णयास साथ दिली. जेष्ठ वद्य अष्टमीला माउलींच्या पादुकांचे देवूळवाड्यातून प्रस्थान झाल्यानंतर सतरा दिवस आजोळघऱी मुक्काम होता. पहाटपूजा, किर्तन, जागर असे नैमित्तिक कार्यक्रम रोजच्या रोज होत होते. दरम्यान आज आषाढ शुद्द दशमी असल्याने पंढऱीकडे जाण्यासाठी शासनाने बस दिली. अवघ्या वीस लोकांसमवेत पादुका पंढरीला नेण्याबाबत एकमत झाले होते. शनिवारी (ता. २७) वारक-यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर वारक-यांना फेसशिल्ड, सॅनिटायझर देण्यात आले. तर बसलाही सॅनिटाईज्ड करण्यात आले होते…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here