Home Breaking News 🛑 श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज; सचिन म्हणतोय मी ७ वर्षांपासून… ...

🛑 श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज; सचिन म्हणतोय मी ७ वर्षांपासून… ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

85
0

🛑 श्रीसंतच्या स्वागतासाठी संघ झाला सज्ज; सचिन म्हणतोय मी ७ वर्षांपासून… 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

⭕( क्रिडा विषयक )⭕
भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याची निवड रणजी संघात केली जाईल. श्रीसंतवर बीसीसीआयने २०१३ च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती.
परंतु, मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला होता. पण त्यावेळी त्याच्या निलंबनाचे ६ वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता १३ सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीच्या ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here