Home Breaking News महाराष्ट्र ठाकरे सरकार राबवणार ” शिवराज पॅटर्न “? तर वीज बिलात नागरिकांना...

महाराष्ट्र ठाकरे सरकार राबवणार ” शिवराज पॅटर्न “? तर वीज बिलात नागरिकांना फायदा होईल…✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

137
0

🛑 महाराष्ट्र ठाकरे सरकार राबवणार ” शिवराज पॅटर्न “?
तर वीज बिलात नागरिकांना फायदा होईल…🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

महाराष्ट्र ⭕ : राज्य आणि देशावरील कोरोना संकट अजून दूर झालेलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अशातच काही नागरिकांना मोठ-मोठी वीजबिले आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वीजबिलाबाबत राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळातील वीज बिल मध्य प्रदेश सरकारकडून 50 टक्के कमी करण्यात आलं आहे. एप्रिलमध्ये 100 रुपयांपर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मे, जून आणि जुलैमध्ये फक्त 50 रुपये भरावे लागतील.
तर जे ग्राहक 100 ते 400 रुपयांपर्यंत बिल भरत होते अशा ग्राहकांना केवळ 100 रुपये भरावे लागतील. तर 400 रुपयावरून अधिक बील देत असलेल्या ग्राहकांचं अर्ध वीज बिल माफ होणार आहे..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here