युवा मराठा न्युज साठी (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड सुरगाणा
सुरगाणा – कळवण तालुक्यात बरसला मुसळधार पाऊस.
दि. ८/६/२०२० रोजी सुरगाणा – कळवण तालूक्याच्या बहुतांश भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. संद्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. अतिवृष्टी मुळे सगळीकडे जलमय भूभाग झाला आहे.
खरीप हंगामातील भात, नाचणी, वरई, या पिकांच्या बियाण्याची जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, या भागातील शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आपल्याला दिसून येतं. या पावसाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.