• Home
  • राजापूर कोतापूर गावात कोरोनाचा शिरकाव

राजापूर कोतापूर गावात कोरोनाचा शिरकाव

🛑राजापूर कोतापूर गावात कोरोनाचा शिरकाव 🛑
रत्नागिरी: ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

राजापूर ⭕- पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या लोकांच्या संर्पकात आलेल्या कोतापूर, ओणी-कोंडीवळे आणि प्रिंदावण येथील आणखीन तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचे तालुक्‍यात संक्रमण होत असल्याचे पुढे आले आहे. कोतापूर गावामध्ये पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केला असून तेथील परिसर कंटेन्मेंट झोन करण्याच्या प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या कोतापूर गावाला तातडीने तहसिलदार प्रतिभा वराळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी तातडीने भेट देवून त्या परिसराची पाहणी केली. यावेळी लोकांशी संवाद साधताना कोरोनाला रोखण्यासाठी कसे रहावे, वागावे, सुरक्षितता कशी घ्यावी आदींबाबत माहिती दिली. त्यांच्यासमवेत कृषी विभागाचे विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्‍यातील पाच गावांमधील चौदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यापूर्वी आढळले आहेत. उशीरा आलेल्या स्वॅबच्या वैद्यकीय अहवालामध्ये तालुक्‍यात आणखीन तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये प्रिंदावण, ओणी-कोंडीवळे आणि कोतापूर येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण यापूर्वी तालुक्‍यात आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबळे यांनी दिली.

प्रिंदावण आणि ओणी यापूर्वीच कंटेन्टमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी योग्य खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात आहे. कोतापूरमध्ये सुमारे १६८ घरे असून त्या ठिकाणी तातडीने आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करण्यासह अन्य खबरदारी घेण्यासाठी चार आरोग्य पथके नियुक्त केल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment