Home महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका* *आमदारांची निधीसाठी संमती*

प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका* *आमदारांची निधीसाठी संमती*

94
0

🔴 *ब्रेकिंग न्यूज* 🔴

*प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका*
*आमदारांची निधीसाठी संमती*
*कोल्हापूर, दि. २४(मोहन शिंदे,ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- -कोवीड काळजी केंद्रासाठी आमदार फंडामधून प्रत्येक तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदार पुढे आले आहेत. यासाठी आपल्या फंडातून निधी देण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जिल्ह्यामध्ये एकूण ४१ कोवीड काळजी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे. या सर्व कोवीड काळजी केंद्रांसाठी सुविधा देण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक रुग्णवाहिका देण्यासाठी आमदारांनी संमती दिली आहे. आमदार राजेश पाटील हे चंदगडसाठी, आमदार पी एन पाटील हे करवीरसाठी, आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील हे महापालिका क्षेत्रासाठी, आमदार विनय कोरे हे शाहूवाडी, आमदार प्रकाश आवाडे हे इचलकरंजी ता. हातकणंगले, आमदार प्रकाश आबिटकर हे भुदरगड- राधानगरीसाठी, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिरोळसाठी रुग्णवाहिका देणार आहेत. मी इचलकरंजी नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका देणार आहे. सर्वांनी यासाठी निधी देण्यास संमती दिली आहे. कागल आणि गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांनी फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दिली आहे. खासदर धैर्यशिल माने यांनीही सॅनिटायझरसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि फवारणी यंत्रासाठी निधी दिला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.
आमदार फंडामधून या रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असेही जिल्हाचे पालकमंत्री श्री सतेज (बंटी)पाटील म्हणाले.

Previous articleदेशभरात सोमवारी ईद साजरी केली जाणार! इमाम बुखारींनी केली घोषणा
Next articleराज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’करिअर निवडीसाठी उपयुक्त या पोर्टलचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here