
- ⭕ यवतमाळ
आज पहाटे सोलापूरहून श्रमिकांना घेऊन निघालेली एस टी महामंडळाच्या बसला भीषण अपघात ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )यवतमाळ: स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी घेऊन निघालेल्या बसला आज सकाळी झालेल्या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
यवतमाळ येथे आज पहाटे ही घटना घडली. अपघातग्रस्त बस सोलापूरहून झारखंडकडे निघाली होती. यवतमाळ येथे ही बस एका ट्रकला धडकली. यात चार जण जागीच ठार झाले. तर, १५ जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरीत मजुरांचे हाल सुरूच आहेत. केंद्र सरकारनं प्रवासाची मुभा देण्याआधी अनेकांनी पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न केला होता. या प्रवासातही अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. औरंगाबादमध्ये अलीकडेच १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.