Home नाशिक “युवा मराठा न्यूज”चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार प्रदान जय...

“युवा मराठा न्यूज”चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार प्रदान जय शिवराय ग्रुपचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

334

आशाताई बच्छाव

1001574571.jpg

“युवा मराठा न्यूज”चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार प्रदान
जय शिवराय ग्रुपचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मालेगाव शहरातल्या कँम्प भागातील जय शिवराय ग्रुपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
जय शिवराय ग्रुपचा हा उपक्रम सन २०१५ पासून अखंडितपणे सुरू आहे.आज संपन्न झालेल्या या सोहळ्यात “युवा मराठा न्यूज”चे मुख्य संपादक, युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वबळावर स्वतः चे स्थान निर्माण करुन आपले जीवन समाजकार्यासाठी झोकून दिले.व अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी विविध आंदोलनातून संघर्ष उभा केला त्यामुळेच आज त्यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५ त्यांच्या संघर्षात्मक कामगिरीची दखल घेऊन देण्यात आला.या निमित्त अनेकांनी राजेंद्र पाटील राऊत यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleविरदेल ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
Next articleभोकरदन तालुक्यातील पारध बु.येथे शिवराज्याभिषेक सोहळाउत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.