Home उतर महाराष्ट्र गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद

गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद

147

आशाताई बच्छाव

1001574336.jpg

गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद     अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 

तपोवन रस्ता परिसरात तरूणाच्या दिशेने गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अकिब दाऊद शेख (वय ३० रा. कवीजंगनगर, गुलमोहर रस्ता, सावेडी), असे ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मिरावली दर्गा परिसरात वेषांतर करून सापळा रचून ही कारवाई केली.
प्रमोद रामदास घोडके (वय २४, रा. दर्गादायरा) व त्यांच्या मित्रांना ऋषी ढवण याच्याशी संबंध ठेवू नये म्हणून पाच जणांनी मारहाण केली व भीमराज आव्हाड या संशयिताने पिस्टलमधून दोन फायर करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.