Home Breaking News २४ तासात मुंबईसह राज्यातील काही भागात अतिवृष्टी…! 🛑

२४ तासात मुंबईसह राज्यातील काही भागात अतिवृष्टी…! 🛑

223

🛑 २४ तासात मुंबईसह राज्यातील काही भागात अतिवृष्टी…! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕जुलैमध्ये काही भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात बहुतांश ठिकाणी येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिलाय.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही प्रामुख्याने घाटमाथ्याच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.

जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असला, तरी जुलैच्या पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिली.

उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत आहेत. परिणामी राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे.

याच स्थितीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस, तर तीन ते चार दिवस राज्यात सर्वत्र पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे.

या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. 4 ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

5 ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.

तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागांत अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार, तर नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, अस पुणे वेधशाळेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे..⭕

Previous article*लोकनियुक्त नगराध्यक्ष कोरोना* *पाँझिटीव्ह*
Next article🛑 खुशखबर….! ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या….! सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.