Home Breaking News अखेर सत्याचा विजय झाला!*

अखेर सत्याचा विजय झाला!*

254

*अखेर सत्याचा विजय झाला!*
*युवा मराठा न्युजच्या बातमीचा दणका*
*आता प्रशासक होणार सरकारी कर्मचारीच!!*
*मालेगांव(युवा मराठा न्युज ब्युरो टिम)*
महाराष्ट्रातील बारा हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचाच्या मुदती संपत असल्याने ,त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून आपल्यालाच संधी मिळावी म्हणून विविध पक्षाच्या पदाधिका-याच्या फिल्डींग लावण्यासाठी पालकमंत्र्यासह आमदाराकडे चकरा वाढल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले होते.
मात्र युवा मराठा न्युजने अगदी सुरुवातीपासूनच या प्रशासक नियुक्तीला विरोध दर्शवून तसे निवेदन राज्यपाल यांना पाठविले होते.आणि गावागावात शासकीय कर्मचारी किंवा पत्रकार यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केलेली होती.
त्यास काल अखेर यश आले. उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय आहुजा
नितीन जामदार यांच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारी कर्मचारीच प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश काढल्याने गावपातळीवरील राजकीय कार्यकर्ते मंडळीचा हिरमोड झाला तर मुश्रीम यांना या न्यायालयाच्या आदेशामुळे मोठीच चपराक बसली आहे.युवा मराठा न्युजने या प्रशासक निवडीला अगोदरच विरोध करुन प्रशासकपदी सरकारी कर्मचारी किंवा पत्रकारांना नियुक्तीची मागणी केलेली होती.अखेर न्यायालयाच्या आदेशामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून युवा मराठा न्युजचे सडेतोड निर्भिड बातमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous article🛑 खासदार..! उदयनराजे भोसलेंची शपथ ठरली सर्व… मंत्र्यांपेक्ष वेगळी 🛑
Next articleपावसा अभावी करपली भाताची रोपं. शेतकरी चिंतेत. (युवा मराठा तालुका प्रतिनिधी. पांडुरंग गायकवाड )
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.