• Home
  • पावसा अभावी करपली भाताची रोपं. शेतकरी चिंतेत. (युवा मराठा तालुका प्रतिनिधी. पांडुरंग गायकवाड )

पावसा अभावी करपली भाताची रोपं. शेतकरी चिंतेत. (युवा मराठा तालुका प्रतिनिधी. पांडुरंग गायकवाड )

पावसा अभावी करपली भाताची रोपं. शेतकरी चिंतेत. (युवा मराठा तालुका प्रतिनिधी. पांडुरंग गायकवाड )
चालू वर्षी जून महिण्याच्या सुरवातीला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी मोठया आनंदाने केली. मात्र हा आनंद निसर्गाने शेतकऱ्यांनाकडून हिरवून घेतला आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण या सारख्या आदिवासी बहुल भागात भात, नागली, वरई यासारखी प्रमुख पिके घेतली जातात. गेल्या महिनाभरापासून या भागात पावसाने दांडी मारली आहे. अगदी भात, नागली, वरई या पिकांची रोपे लागणीच्या टप्प्यात आली असून पावसाअभावी करपून चालली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षी च्या तुलनेत या भागात सरासरी ५%पाऊस झाला असून, या पिकांसाठी जास्तीच्या पावसाची आवश्यकता असते. परंतु पावसाअभावी या पिकांची लागण खोळंबली आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या वीज पंपाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी भात लागण केली असून मात्र पाऊस पडत नसल्याने लावलेली रोपं करपून चालली आहेत.
कोरोना सारख्या महामारीचा सामना चालू असतानाच शेतकरी वर्ग अस्मानी संकटात सापडला आहे. रोपं करपून चालली असताना दुबार पेरणी करूनही काही उपयोग होणार नाही. म्हणून माझा बळीराजा हवालदिल झाला आहे.

anews Banner

Leave A Comment