Home Breaking News ओसंडून वाहतोय मुंबईतील पवई तलाव, घरबसल्या घ्या पावसाळी पर्यटनाचा आनंद! 🛑 मुंबई...

ओसंडून वाहतोय मुंबईतील पवई तलाव, घरबसल्या घ्या पावसाळी पर्यटनाचा आनंद! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

164
0

🛑 ओसंडून वाहतोय मुंबईतील पवई तलाव, घरबसल्या घ्या पावसाळी पर्यटनाचा आनंद! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 6 जुलै : ⭕ देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदा सगळ्यांनाच पावसाळी पर्यटनास मुकावं लागणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. मात्र, देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे यंदा सगळ्यांनाच पावसाळी पर्यटनास मुकावं लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळे पवई तलाव परिसर ओस पडला आहे. पवई तलाव भरून वाहू लागला की येथे पर्यटक मोठी गर्दी करतात. वर्षा सहलीला येतात. यंदा मात्र पर्यटनावर कोरोनाचं सावट आहे. पवई तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही. मुंबईतील उद्योगिक वापरासाठीच पवई तलावाचं पाणी वापरलं जातं.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here