Home Breaking News 🛑 उद्या मुख्यमंत्री गाडी पण धुतील तर आम्ही काय करू..! निलेश राणेंनी...

🛑 उद्या मुख्यमंत्री गाडी पण धुतील तर आम्ही काय करू..! निलेश राणेंनी डागली तोफ 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

96
0

🛑 उद्या मुख्यमंत्री गाडी पण धुतील तर आम्ही काय करू..! निलेश राणेंनी डागली तोफ 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे मुंबईहून पंढरपूरला आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबत ड्रायव्हर ठेवला नाही. स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर असा दोन्ही साईडचा प्रवास केला. राज्यातील मुख्यमंत्र्याने स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं सांगण्यात येतं.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क लावल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. बैठका घ्यायच्या असतील तर त्या ऑनलाइन घेण्यावरही त्यांचा भर असतो. शिवाय करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कुठेही जायचे असेल तर ते स्वत: गाडी चालवत जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाहून मंत्रालयात जायचे असेल तरीही ते स्वत: गाडी चालवत जातात. त्यामुळे पंढरपूरला विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी परवा त्यांचा ताफा निघाला, पण त्यांच्या गाडीत ड्रायव्हर नव्हता. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पंढरपूरला गेले. यावेळी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत होते.
दरम्यान, यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. ‘म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली. बरोबर आहे, सरकार अधिकारी चालवतायत, मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो पण इकडे ७ तास मुख्यमंत्री गाडी चालवतो म्हणजे कोरोना या विषयावर सरकार किती गंभीर आहे दिसून येते. उद्या ते गाडी पण धुतील तर आम्ही काय करू’? अस ट्विट करून निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here