*बीडच्या मौलाना आझाद संस्थेचा पत्रकारीता रत्न पुरस्कार राजेंद्र पाटील राऊत यांना जाहिर*
नांदेड( राजेश भांगे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- पत्रकारिता क्षेत्रात अल्पावधीतच स्वबळावर संपूर्ण महाराष्ट्रभरात नावलौकिक वाढवून दबदबा निर्माण करणाऱ्या युवा मराठा प्रिंन्टमिडीया अँन्ड न्युज चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना”पत्रकारिता रत्न” पुरस्कार नुकताच बीडच्या मौलाना आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहिर करण्यात आल्याची घोषणा संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केली.
अत्यंत संघर्षमय वाटचाल करुन पत्रकारिता क्षेत्रालाच आपले ध्येय मानून अगदी अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक करण्याबरोबरच निर्भिड पत्रकारितेचा दबदबा वाढविणा-या राजेंद्र पाटील राऊत यांच्या कार्याचा उचित सन्मान व गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सचिव सय्यद यांनी सांगितले.
राजेंद्र पाटील राऊत यांना यापुर्वी मुंबई येथील क्राँईम इन्वीस्टीगेशन एक्सप्रेस या वृतपत्राकडून दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार तर मालेगांवच्या तत्कालिन तहसिलदार सौ.ज्योती देवरे यांचे हस्ते निर्भिड पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात येऊन गौरविण्यात आले आहे.
तर लवकरच बीड येथील मौलाना आझाद संस्थेचा पुरस्कार राजेंद्र पाटील राऊत यांना सन्मानपुर्वक बहाल करण्यात येणार आहे.राजेंद्र पाटील राऊत यांना हा पुरस्कार जाहिर होताच महाराष्ट्रभरातून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Home Breaking News बीडच्या मौलाना आझाद संस्थेचा पत्रकारीता रत्न पुरस्कार राजेंद्र पाटील राऊत यांना जाहिर*