Home Breaking News तुकाराम मुंढे यांची! केंद्र सरकारकडे तक्रार ! ✍️नागपूर ( विजय पवार...

तुकाराम मुंढे यांची! केंद्र सरकारकडे तक्रार ! ✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

142
0

🛑 तुकाराम मुंढे यांची! केंद्र सरकारकडे तक्रार ! 🛑
✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नागपूर :⭕ नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तक्रार केली आहे. तुकाराम मुंढे यांच्याविरोधात थेट केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांनी पीएमओला पत्र लिहिलं. स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात पत्र लिहून गडकरींनी तुकाराम मुंढे यांची तक्रार केल्याची माहिती आहे.

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’चे सीईओ तुकाराम मुंढे यांचे अवैध, असंवैधानिक, आणि घोटाळेबाज वर्तन असल्याचे पत्र गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे.
तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्त म्हणून धुरा खांद्यावर येताच ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाची जबाबदारी अवैधरीत्या बळकावल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

निविदा रद्द करणे, कोरोनासारख्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना टर्मिनेट करणे असे निर्णय मुंढे यांनी घेतल्याचा दावाही गडकरींनी पत्रात केला आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला होता. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिला, असा आरोपदेखील त्यांनी केला होता…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here