Home Breaking News सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी! अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांचे...

सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी! अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न! ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पुणे :⭕सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नाग

61
0

🛑 सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी! अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न! 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानाला मुंबईत उतरण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून, या नागरिकांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चार्टर्ड विमानाला मुंबईत उतरण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबियाचे अध्यक्ष मधुकर हडकर डॉ. कोल्हे यांना निवेदने पाठवून मदतीची विनंती केली होती.
त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारने सौदी अरेबियातून महाराष्ट्रातील नागरिकांना घेऊन येणाऱ्या चार्टर्ड विमानाला मुंबई व पुणे येथे उतरण्याची परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेरीस अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु, राज्य सरकारने परवानगी देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यास विलंब होत असल्याने उशीर होत होता.
दरम्यान, केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत विमानसेवा सुरू केली. त्यानंतर सौदी अरेबियातील अनेक भारतीय नागरिक भारतात परतत असताना महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई, नागपूर अथवा पुणे येथे येणारी फ्लाईट्स उपलब्ध नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र मंडळ, सौदी अरेबिया या संघटनेचे अध्यक्ष मधुकर हडकर यांनी सर्व महाराष्ट्रीयन नागरिकांची एकजूट उभारून चार्टर्ड विमानाने येण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना डॉ. कोल्हे यांनी आवर्जून प्रतिसाद दिला आणि आपल्या बांधवांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी सातत्याने ई-मेल, फोन येत होते. सौदी अरेबियातील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर हडकर हेही सतत संपर्कात होते. तेथील महाराष्ट्रीयन बांधवांची मनोवस्था व अडचणी मी समजू शकत होतो. म्हणूनच मी त्यांच्यासाठी झटून एका मिशनप्रमाणे प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नांना यश आले, याचा आणि आता आपले बांधव घरी परत येतील याचा मला अतिशय आनंद झाला आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार.⭕

Previous articleठाकरे सरकारचा निर्णय! सरकारी कामासाठी मराठी वापरा नाहितर..✍️महाराष्ट्र ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्यु
Next articleतुकाराम मुंढे यांची! केंद्र सरकारकडे तक्रार ! ✍️नागपूर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here