Home Breaking News मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त ! प्रतिनिधी=किरण अहिरराव

मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त ! प्रतिनिधी=किरण अहिरराव

667

मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त !

प्रतिनिधी=किरण अहिरराव

येवला l येवला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पिक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.मात्र मागील वर्षापासून मका पिकावर पडत असलेल्या अमेरिकन अळीचे नवीन संकट शेतकरी वर्गापुढे उभे ठाकले आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी साठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरु आहे.अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळले आहे .यावर फवारणी करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत असल्याने शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे.

येवला तालुक्यात यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने शेती मशागतीची कामे पूर्ण करीत जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसावर मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.मात्र उगवण झालेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असून विविध उपाययोजना ,औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून ताटात वाढलेला घास हिरावला जातो कि काय अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबत येवला तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करीत आहे.

मका लागवडीनंतर नंतर आठच दिवसात मका पिवळी पडू लागली .या मका पिकावर मोठया प्रमाणावर लष्करी अळीने थैमान घातले आहे.अळी नियंत्रणासाठी सुमारे आठ हजार रुपये खर्च करून दोन वेळेस औषध फवारणी केली मात्र अळी नियंत्रणात येत नाही. संजय भवर ठाणगाव

Previous articleआमदारांच्या प्रतिमेस दुग्ध* *अभिषेक* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* .कोल्हापुर
Next articleइचलकरंजी मधे कोरोना रूग्णांचा आकडा वाढला. _मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा_ न्यूज.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.