Home विदर्भ बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत विशिष्ट गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ...

बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत विशिष्ट गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते — ॲड खांडपासोळे.

111

आशाताई बच्छाव

1001749625.jpg

बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत विशिष्ट गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते — ॲड खांडपासोळे. हिंगोली , श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ- विशेष बालका संदर्भातून घडलेल्या गुन्ह्यांमध्ये, मृत्यूदंडा पर्यंत आता शिक्षा होऊ शकते त्यामुळे बाल न्यायालय अधिनियम २०१५ व बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण २०१२ ची अभ्यासपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन दिशा संस्थेचे प्रमुख ॲड प्रवीण खांडपासोळे ह्यांनी केले.हिंगोली येथील स्व. शिवाजीराव देशमुख नगर सभागृहात आयोजित बालकांचे हक्क व सुरक्षा संदर्भात आयोजित कार्य शाळेत ते बोलत होते.हिंगोली जिल्हा पोलिस व दिशा प्रतिष्ठान ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत हिंगोली शहर आणि परिसरातील शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी,शिक्षक प्राचार्य,स्कूल बस,ऑटो रिक्षा मिनी बस, चालक,वाहक केअर टेकर,पोलिस,आर टी ओ,निमंत्रित ह्या कार्य शाळेत सहभागी झाले होते.सर्व प्रथम जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे ह्यांनी प्रमुख वक्ते ॲड प्रवीण खांडपासोळे ह्यांचं स्वागत केलं,तर हिंगोली शहर पोलिस प्रमुख संदीप मोदे ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे ह्यांचं स्वागत केलं.आरटीओ अधिकारी अतुल बानापुरे ह्यांचं स्वागत वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक संदीप मरे ह्यांनी केलं ह्या प्रसंगी जिल्हा विशेष शाखा प्रमुख बद्रीनाथ सानप व पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व ॲड खांडपासोळे ह्यांचं स्वागत केलं.बालकांवरील अत्याचार व गुन्ह्यांचे वाढते परिणाम बघता ह्यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे झालेत त्या अन्वये बालकांच्या सर्वप्रकारच्या मानसिक,शारीरिक ,लैंगिक शोषणाच्या व्याख्या व्यापक झाल्यानं म्हणून बालकांच्या येणाऱ्या सर्वांकडून जसे शिक्षण,ने आण करणारे चालक ,वाहक,आदीं कडून अनवधानाने सुद्धा कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडत असल्यास दुर्लक्ष होऊ नये ह्यासाठी ही आयोजन असल्याचं ॲड खांडपासोळे ह्यांनी सांगून दृक श्राव्य माध्यमातून माहिती देऊन जनजागरण केले.काय करावे व काय करू नये एन केल्यास मृत्यू दंडापर्यंत होणाऱ्या शिक्षा व कायद्याची माहिती त्यांनी उपस्थिताना दिली.प्रत्येक शाळेत ह्याबाबत हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने काय करावे व काय करू नये चे भीतीपत्रके लावून सर्वांना माहिती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी केली.सोशल व नेचूरल जस्टिस कायद्यात सूट नाही हे लक्षात घेऊन आपण सजग रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय समारोपात जिल्हा पोलिस अधीक्षक कोकाटे ह्यांनी ह्या कार्यशाळेतून मिळालेली माहिती जतन करून त्यावर अमल करावा बालकांच्या सुरक्षा व अन्य बाबी संदर्भातील कायदे पालन करावे,बालकांची ने आण करताना कार्यशाळेत सांगितलेल्या माहिती नुसार कार्यरत रहावे अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल ते टाळावे अस आवाहन केलं.स्वागतपर प्रास्ताविक व संचालन ज्येष्ट पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी केलं आभार संदीप मोदे ह्यांनी मानले,दिशा संस्थेचे मुकेश वानखडे,बद्रीनाथ गायकवाड,पूनम महाडिक,वाहतूक शाखा,शहर पायस पोलिस स्टेशन,जिल्हा विशेष शाखेच्या अधिकारी कर्मचारी मंडळींनी यशस्विते साठी परिश्रम घेतले.हिंगोलीत प्रथमच अस आयोजन करण्यात आल्याने उपस्थितांनी जिल्हा पोलिस दल व दिशा प्रतिष्ठान च कौतुक केलं.ह्यानंतर जिल्ह्यातील तालुका मुख्यालयात अस नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

Previous articleदेगलूर शहरात पावसात निर्माण झाला जलतलाव; नागरिक संतप्त
Next articleसौ सुनिता ताई वाळुंज अ भा मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.