Home नाशिक सौ सुनिता ताई वाळुंज अ भा मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र महिला...

सौ सुनिता ताई वाळुंज अ भा मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

221

आशाताई बच्छाव

1001749645.jpg

सौ सुनिता ताई वाळुंज अ भा मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने घेतली सामाजिक कार्याचे दखल

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे

महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणाऱ्या वारकरी मंच महाराष्ट्र राज्य च्या सिन्नर तालुका महिला वारकरी मंच अध्यक्षा तसेच जेष्ठ साहित्यिक व कवयित्री सौ सुनिता ताई विजय वाळुंज (सिन्नर) यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद “उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष” पदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ शुभांगी ताई काळभोर यांनी दिली आहे.
सौ सुनिता ताई विजय वाळुंज यांच्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा दि. ३१/१२/२०२८ पर्यंत राहणार असून आपल्या कुशलतेने साहित्य परिषदेचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवाल व सुदृढ समाज स्वास्थ्य राहील यासाठी अविरतपणे कार्यरत रहाल हीच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा ठेवली आहे.आपल्या कार्याद्वारे सात्विक सुविचारांची पेरण करून समानतेचा मळा फुलवाल अशी आम्हाला खात्री असल्याने आपणांस नवीन जबाबदारी दिली आहे अशी माहिती देण्यात आली आहे. आपल्या हातून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्य जोमाने वाढवून मनोमंदिराच्या गाभाऱ्यात सदविचारांची सार्थकता अढळ राहो हीच प्रार्थना.
या नियुक्तीबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश कोंडे महाराज देशमुख आळंदीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प मधुकर महाराज जाधव सातारा, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर निफाड तसेच वारकरी मंच नाशिक जिल्हा कार्यकारी वारकरी मंच नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणी तसेच निफाड तालुका वारकरी मंच, सिन्नर तालुका वारकरी मंच, येवला तालुका वारकरी मंच, नांदगाव तालुका वारकरी मंच, चांदवड तालुका वारकरी मंच, नाशिक तालुका वारकरी मंच आदी सर्व कार्यकारणी सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.