Home नाशिक श्रीक्षेत्र देवगाव शनी येथे ३० जुलै पासून योगिराज सद्‌गुरु श्री गंगागिरीजी महाराज...

श्रीक्षेत्र देवगाव शनी येथे ३० जुलै पासून योगिराज सद्‌गुरु श्री गंगागिरीजी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह

157

आशाताई बच्छाव

1001749671.jpg

श्रीक्षेत्र देवगाव शनी येथे ३० जुलै पासून योगिराज सद्‌गुरु श्री गंगागिरीजी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह

दैनिक युवा मराठा 
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

जागृत देवस्थान श्री शनैश्वर महाराज यांच्या पवित्र पावनभूमीत गोदातिरी वारकरी सांप्रदायाचा महाकुंभ संबोधला जाणारा योगिराज सद्‌गुरु श्री गंगागिरीजी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र देवगांव शनि व सप्तकृषी चेंडूफळ, बाजाठाण, अव्वलगाव, हमरापूर, भामाठाण, कमालपूर ता. वैजापूर, जि. छ.संभाजीनगर येथे बुधवार दि. ३० जुलै २०२५ ते बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत होणार असून ८ ते १० हजार टाळकऱ्यांच्या उपस्थितीत अखंड ७ दिवस भजन तसेच प. पू. गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतुन दररोज दुपारी १ ते २ वाजेपर्यंत प्रवचन तसेच एकादशीनिमित्त दुपारी २ ते ४ या वेळेत सुश्राव्य किर्तन तसेच ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वा. लाखो भाविकांच्या उपस्थित काल्याचे किर्तन होणार आहे तरी आपण या अभुतपूर्व सोहळ्याचा लाभ घेवून भगवंताचरणी आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनंदिन कार्यक्रमात दररोज सकाळी ९.०० ते ११.०० वा. किर्तन, दुपारी १.०० वा. प्रवचन व दुपारी २.०० ते ४.०० वा. किर्तन होणार असून ८ ते १० हजार टाळकऱ्यांच्या उपस्थितीत अखंड ७ दिवस भजन होणार आहे.
सप्ताह काळात दररोज लाखो भाविक आमटी भाकरीचा आस्वाद घेतात. तसेच एकादशी निमित्त ८ ते १० लाख भाविक फराळाचा महाप्रसाद घेतात. त्याचप्रमाणे काल्याच्या दिवशी १० ते १२ लाख भाविक महाप्रसाद घेतात.

Previous articleसौ सुनिता ताई वाळुंज अ भा मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड
Next articleपहेला येथील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.