Home मुंबई कँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल !

कँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल !

220

आशाताई बच्छाव

1001694714.jpg

कँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मुंबई :- बुलडाणा शिवसेनेचे बुलढाणा मतदारसंघातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा कारण ठरलंय आमदार निवासातील कँटिनमध्ये घडलेली धक्कादायक घटना! निष्कृष्ट जेवणावरून गायकवाड यांनी थेट कँटिनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.घटना अशी की, आमदार गायकवाड यांनी खोली क्रमांक १०७ मध्ये जेवण मागवले होते. मात्र, डाळीतून वास येत असल्याने आणि काही जणांचे पोट बिघडल्याची तक्रार मिळाल्यानंतर संतप्त गायकवाड थेट कँटिनमध्ये पोहोचले. तेथील कर्मचाऱ्याला डाळीचा वास घेऊन बघ, असं म्हणत कानशिलात लगावली आणि नंतर बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेदरम्यान संबंधित कर्मचारी माफी मागत होता, तरीही आमदार गायकवाड यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आमदार निवासासारख्या सुरक्षित आणि शासकीय ठिकाणी एका लोकप्रतिनिधीकडून अशी वर्तणूक धक्कादायक मानली जात आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून, यावर नागरिक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कायदेशीर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Previous articleभटके कुत्रे उठले जीवावर ! – शहरात ११ जणांना श्वानदंश ! – नागरिक भयभीत ! –
Next articleजुबा केसरी ! एसपी निलेश तांबेची धडाकेबाज कारवाई! – दोन लाख 89 रुपयांचा गुटखा हस्तगत !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.