Home बुलढाणा जुबा केसरी ! एसपी निलेश तांबेची धडाकेबाज कारवाई! – दोन लाख 89...

जुबा केसरी ! एसपी निलेश तांबेची धडाकेबाज कारवाई! – दोन लाख 89 रुपयांचा गुटखा हस्तगत !

148

आशाताई बच्छाव

1001694734.jpg

जुबा केसरी ! एसपी निलेश तांबेची धडाकेबाज कारवाई! – दोन लाख 89 रुपयांचा गुटखा हस्तगत !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
धाड :- बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने अवैध धंद्यांनाआळा घालण्याचे फार्मन सुटल्यापासून, सर्वच पोलीस विभाग सतर्क झाले असून, कारवाई करण्यासाठी सज्ज झालेत. दरम्यान धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत प्रतिबंधक गुटखा कारवाई करण्यात आली असून, तब्बल दोन लाख 89 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ही करावी ८ जुलै रोजी करण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे अद्यापही फोफावले आहेत. पोलीस प्रशासनाला बरीच कसरत करावी लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आल्यापासून ते आपल्या धडाकेबाज कारवाईचा परिचय देत आहेत. काल देखील धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा जप्तीची कारवाई करून एका आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी 2,89,840 रुपयांचा मुद्देमाल व एक पांढऱ्या रंगाची 5,00,000 किमतीची बोलेरो असा एकूण 7,89,840 रुपयांचा मध्यमान हस्तगत करण्यात आला आहे. दीपक लेकरूवाळे, शेख चांद, गणेश पाटील, गजानन गोरले या पथकाने ही कारवाई केली.

Previous articleकँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल !
Next articleपंढरपूर वरून येणाऱ्या वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; ३० वारकरी जखमी….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.