Home बुलढाणा भटके कुत्रे उठले जीवावर ! – शहरात ११ जणांना श्वानदंश ! –...

भटके कुत्रे उठले जीवावर ! – शहरात ११ जणांना श्वानदंश ! – नागरिक भयभीत ! –

142

आशाताई बच्छाव

1001694703.jpg

भटके कुत्रे उठले जीवावर ! – शहरात ११ जणांना श्वानदंश ! – नागरिक भयभीत ! –
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून, आज ९ जुलै रोजी दुपारी या हैदोसाने विक्राळ रूप घेतले. हिरोळे पेट्रोल पंप परिसरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने थेट रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकावर हल्ला चढवला. या एका घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याच कुत्र्याने आतापर्यंत तब्बल १० ते ११ जणांना चावा घेतल्याचे उघड झाले आहे.

शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांचे टोळके मुक्त संचार करत असून, सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे कर्मचारी आणि वृद्ध नागरिक जीव मुठीत धरून चालताना दिसत आहेत. पूर्वीही अशा हल्ल्यांमध्ये अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असून, सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ प्रशासनामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. आज झालेल्या घटनेनंतर जखमी व्यक्तीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुज्ञ नागरिकांनी धाडस दाखवत त्याला मदत केली, मात्र प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे ‘झोपे’तच असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ न केल्यास आणखी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता लोकांनी मनपावर रोष व्यक्त करत कुत्रे मोकाट प्रशासन गाफील ! अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्वरित उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

Previous articleपत्रकार, समाजसेविकेचा छळ करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी!
Next articleकँटिनमधील जेवणावरून संतापले; आमदार संजय गायकवाडांचा राडा कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.