आशाताई बच्छाव
शासकीय स्त्री रुग्णालयात पेशंटला घेऊन येणाऱ्या वाहनचालकाला करावी लागते तारेवरची कसरत .हिंगोली, ब्युरो चीफ श्रीहरी अंभोरे पाटील -जिल्ह्यातील शासकीय स्त्री रुग्णालय वसमत येथे महिला रुग्णालयात जाण्यासाठी रस्त्याची मोठी दुरावस्था पाहायला मिळते .वसमत शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक महिला उपचार साठी येत असतात पन या रुग्णालयात पेशंट ला घेवुन येण्यासाठी रस्त्याची मोठी दुरावस्था पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकिय अधिकारी यांच्या यांच्या कामचुकार धेयधोरणा मुळे व प्रशासन यांच्या दुर्लक्ष यामुळे महिला रूग्णालयात येणार्या महिलाना मोठा त्रास होत आहे.
ग्रामीण किंवा शहरी भागातील सर्वच महिला पेशंटला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करताना एकच रस्ता आहे त्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात येणार्या महिला पेस्टन्टला पर्यायी दुसर्यां मार्ग नसल्याने शेवटी ह्याच रस्त्यावरून पेशंट ला आनावे लागते .
रस्त्यावरची दुरावस्था एवढी मोठी झालेली आहे कि मोटारसायकल ला रस्ता शोधावा लागतो इमर्जन्सी पेशंट डिलिव्हरीचा एखाद्या वेळेस वेळेत पोहोचायचा असेल तर त्या पेशंटला वेळेवरती रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही कारण रस्त्यामधील अनेक मोठमोठे खड्डे पावसाने त्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी त्यामुळे रस्ता शोधत ड्रायव्हरला गाडी चालवायला लागते अशा प्रसंगी ॲम्बुलन्स रुग्णवाहिका यामध्ये उपलब्ध असलेला महिला पेशंट हा अनेक वेळा रस्त्या मध्येच प्रस्तुती झाल्याच्या घटना घडल्या आहेत पण अध्याप तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग वसमत यांचे शाप दुर्लक्ष दिसून येत आहे व प्रशासनाचे सुद्धा सदरील बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे यामुळे शासकीय स्त्री रुग्णालयात येण्यासाठी वाहनधारकाबरोबरच पेशंटलाही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.






