Home बुलढाणा शेगावची गायत्री रोहनकर थेट ‘मिस एशिया वर्ल्ड 2025! – दुबईत भारताचा डंका

शेगावची गायत्री रोहनकर थेट ‘मिस एशिया वर्ल्ड 2025! – दुबईत भारताचा डंका

118

आशाताई बच्छाव

1001678590.jpg

शेगावची गायत्री रोहनकर थेट ‘मिस एशिया वर्ल्ड 2025! – दुबईत भारताचा डंका
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
शेगाव :- बुलडाणा शेगावची तेजतर्रार मुलगी गायत्री रोहनकर हिने दुबईत पार पडलेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत खणखणीत विजय मिळवत भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. २२ जून रोजी ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे पार पडलेल्या या दिमाखदार स्पर्धेत ४० हून अधिक आशियाई देशांच्या
प्रतिनिधींना पछाडत गायत्रीने हा बहुमान पटकावला.

गायत्रीचं सौंदर्य, तीव्र बुद्धिमत्ता, सामाजिक बांधिलकी आणि प्रभावी संवादकौशल्य यांमुळे परीक्षक भारावून गेले. अंतिम फेरीत तिने दिलेलं उत्तर, “सौंदर्य म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आशा निर्माण करणारी प्रेरणा असते,” या वाक्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध केलं. परीक्षकांच्या एकमताने तिला विजेतेपद बहाल करण्यात आलं आणि प्रसिद्ध अभिनेत्री अदिती गोवितकर यांच्या हस्ते तिला ताज परिधान करण्यात आला. शेगावच्या या कन्येने केवळ सौंदर्य नव्हे, तर सामाजिक कार्यातही मोलाचं योगदान दिलं आहे.

‘उज्ज्वला’या उपक्रमातून तिने ग्रामीण मुलींसाठी आरोग्य व शिक्षण विषयक चळवळ उभी केली आहे. इंजिनीअरिंगनंतर मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना गायत्रीने आपल्या कुटुंबीयांचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल केलं आहे.

Previous articleझेंडा भाजपाचाच ! विजयराज शिंदे म्हणाले… – कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा
Next articleज्यांची शिवसेना नकली, गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली..!’ – जयश्री शेळके आणखी काय म्हणाल्या..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.