Home बुलढाणा झेंडा भाजपाचाच ! विजयराज शिंदे म्हणाले… – कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा

झेंडा भाजपाचाच ! विजयराज शिंदे म्हणाले… – कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा

132

आशाताई बच्छाव

1001678574.jpg

झेंडा भाजपाचाच ! विजयराज शिंदे म्हणाले… – कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची गळ्यात माळ पडल्यापासून नव्हे तर आधीपासूनच पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणाऱ्या माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक भाजपाचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील असा दावा केला आहे. प्रामुख्याने बुलढाणा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा! असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा संपर्क कार्यालय शिवालय येथे बुलढाणा शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकारी यांची छोटेखानी बैठक 5 जुलै रोजी संपन्न झाली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत ह्या निवडणूका कार्यकर्त्यांना व पक्षाला बळकटी देणाऱ्या निवडणुका आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ यामुळे जनसामान्यांत भाजपा पक्षाने आपली प्रतिमा उंचावली आहे. विकासाची ही गती अधिक तिव्र करण्यासाठी बुलढाणा नगर पालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणुन बुलढाणा नगर पालिकेवर भाजपचा झेंडा ताकदीने फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन माजी आ. विजयराज शिंदे यांनी उपस्थितांना केले. यावेळी शहराध्यक्ष मंदार बाहेकर व शहर भाजपचे आजी माजी नगरसेवक , पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleबा पांडुरंगा … बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
Next articleशेगावची गायत्री रोहनकर थेट ‘मिस एशिया वर्ल्ड 2025! – दुबईत भारताचा डंका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.