Home भंडारा तुमसर तालुक्यात शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम, ६ ते १८ वयोगटातील बालकांचे होणार...

तुमसर तालुक्यात शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम, ६ ते १८ वयोगटातील बालकांचे होणार सर्वेक्षण

97

आशाताई बच्छाव

1001674999.jpg

तुमसर तालुक्यात शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम,
६ ते १८ वयोगटातील बालकांचे होणार सर्वेक्षण

 

संजीव भांबोरे
भंडारा-– पंचायत समिती तुमसर प्शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक 15 जुलै पर्यंत शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देण्यात येणार आहे .अशी माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे- भिवगडे यांनी दिली.
तुमसर तालुक्यातील शाळाबाह्य बालकांचा तसेच हंगामी स्थलांतरित होणाऱ्या बालकांचा शोध वाड्या, वस्त्या, गाव तसेच वॉर्ड ,शहरी वस्त्यांमध्ये घेऊन या बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 1 ते 15 जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांची सर्वोच्च मोहिमे राबविण्यात येत आहे .प्राप्त एस. ओ .पी .अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मधील सूचनांचे पालन करून शाळाबाह्य बालके व हंगामी स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षनाचे कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. या मोहिमेसाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे .त्यात तालुका महिला व बाल विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी नगरपालिका, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्या समावेश आहे. शाळा स्तरावर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व अंगणवाडी पर्यवेक्षक तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक ,अंगणवाडी सेविका – मदतनीस यांचा समावेश आहे .तालुका स्तरावर ६ ते १८, ३ ते ६, नागरिक स्तरावर ६ ते १८, ३ ते ६ वयोगटातील बालकांचे संरक्षण करण्यात येणार आहे. ग्रामीण व नागरी क्षेत्रात ६ ते 1१८ व ३ ते ६ वयोगटातील बालकांचे संरक्षण करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुक्यांमध्ये विखुरलेल्या वाड्या , वस्त्यामधील एकही बालक शाळाबाह्य राहता कामा नये ,याकरिता शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. तुमसर तहसीलचे तहसीलदार श्री जांभुळकर ,गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश साठवणे, टेकचंद पुष्पतोडे,पूजा लांजेवार कार्यालय अधीक्षक नगर परिषद तुमसर ,अंगणवाडी सेविका, तालुका बालरक्षक श्री सेवाग्राम शरणागत, श्री प्रमोद रहांगडाले ,सचिन बागडे यांच्या समन्वयाने मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे- भिवगडे यांनी केले आहे.

Previous articleकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपास चे उद्घाटन
Next articleधांद्री येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.