Home वाशिम रस्ते, नाले, कचरा व्यवस्थापन पथदिवे समस्यांवर त्वरित उपाय योजना करण्याची निवेदनाव्दारे मागणी

रस्ते, नाले, कचरा व्यवस्थापन पथदिवे समस्यांवर त्वरित उपाय योजना करण्याची निवेदनाव्दारे मागणी

184

आशाताई बच्छाव

1001641389.jpg

रस्ते, नाले, कचरा व्यवस्थापन पथदिवे समस्यांवर त्वरित उपाय योजना करण्याची निवेदनाव्दारे मागणी

अनसिंग/वाशिम जिल्हा प्रतिनिधी:- (ता.२७):-पावसाळ्याच्या पहिल्या पावसातच येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिक सातव व यश चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला लेखी निवेदन देऊन त्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या पावसाळ्याच्या काळात गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साचून राहते, जे आरोग्यास घातक ठरत आहे. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने डास व कीटकांची संख्या वाढून साथीचे आजार पसरू शकता त़सेच गावातील सदोष नाल्यामुळे नालीतील पाणी न वाहता अनेक ठिकाणी तुंबल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय, गावात कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. सार्वजनिक खांबावरील पथदिवे बंद असल्याने अंधारात नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.अशा एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत ह्या सर्व समस्यांवर वेळीच उपाययोजना करण्यात याव्या, अन्यथा ग्रामस्थांना उपोषण किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Previous articleशिक्षण: प्रश्न अनेक- उत्तर एक, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.
Next articleहिंगोली जिल्ह्यातील बाभुळगाव येथे शक्तीपिठ माहामार्ग शेतकरी आक्रमक संघर्ष समीतीची बैठक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.