Home जालना शिक्षण: प्रश्न अनेक- उत्तर एक, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.

शिक्षण: प्रश्न अनेक- उत्तर एक, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.

195

आशाताई बच्छाव

1001641374.jpg

शिक्षण: प्रश्न अनेक- उत्तर एक, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सेवापूर्ती गौरव सोहळा.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २७/०६/२०२५
मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे सरांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह आणि लाॅंन्स, मुक्तेश्वर द्वार जालना येथे २९ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. पुरुषोत्तम जुन्ने आणि डॉ.मारुती तेगमपुरे संपादित’ शिक्षण: प्रश्न अनेक -उत्तर एक'( श्री ज्ञानोबा वरवट्टे गौरव ग्रंथ) या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच श्री ज्ञानोबा वरवट्टे सरांच्या सेवापुर्तीचे औचित्य साधून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक संघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री रमेश आंधळे हे असणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आणि ग्रंथ प्रकाशन मा. आमदार श्री सुधाकर अडबाले (सदस्य, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य )यांच्या शुभहस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर हे प्रस्तुत ग्रंथावर भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मा. श्री बाळासाहेब खरात (शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जि. प. जालना) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री सूर्यकांत विश्वासराव (अध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ), श्री राजकुमार कदम (सरचिटणीस, मराठवाडा शिक्षक संघ) डॉ. पुरुषोत्तम जुन्ने, डॉ.मारुती तेगंपुरे ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय येळवंते, प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जगन वाघमोडे, नारायण मुंडे, भीमाशंकर शिंदे, दीपक शेरे, प्रद्युम्न काकड ,गणेश चव्हाण, फरकूंद अली सय्यद, तुकाराम पडघन ,भगवान धनगे, हकीम पटेल, ज्योती पांगारकर ,रमेश गाढे ,गणेश म्हेत्रे, आनंद वाघ, जनार्दन कुदर, सुधाकर डोईफोडे, बबन लंके, विजयकुमार खरात, शिवहरी कायंदे, राधेश्याम चौधरी, पांडुरंग राठोड, रफिक शेख, दस्तगीर शेख, देविदास बनकर ,राजकुमार कान्हेरे हे आणि जिल्हा व तालुका कार्यकारिणी जालना जिल्हा प्रयत्न करत आहे.