आशाताई बच्छाव
पिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव येथील समाधान बेराड यांचे चिरंजीव वेदांत समाधान बेराड याने दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालय च्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते याही वर्षी मे 2025 मध्ये वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे या परीक्षेत वेदांत समाधान बेराड या विद्यार्थ्याने 720 पैकी 512 गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे पिंपळगाव रेणुकाई ग्रामीण भागातून नीट परीक्षा मध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे मात्र वेदांत समाधान बेराड याने अथक परिश्रमानंतर आई वडील आणि पिंपळगाव परिसराची मान उंचावेल असे यश संपादन केले आहे वेदांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.