Home जालना एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा...

एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश

88

आशाताई बच्छाव

1001571047.jpg

 

 

“एक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश

जालना, दि. 0५ जून (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता स्त्री रुग्णालय, गांधीचमन, जालना येथे “एक पेड माँ के नाम” या भावनिक आणि प्रेरणादायी संकल्पनेखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.  या उपक्रमांतर्गत फळझाडे, औषधी वनस्पती व छायादायक झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सहभागी सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा शपथविधी केला व हिरवे भविष्य घडवण्याचा संकल्प केला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करताना, “वृक्ष ही निसर्गाची संपत्ती असून भावी पिढ्यांना शुद्ध हवामान आणि हिरवे जग सोडण्यासाठी आजच झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे आवश्यक आहे,” असे थोडक्यात मार्गदर्शन केले.

यावेळी विमलताई आगलावे, विजय कामड, बद्रिनाथ पठाडे, अशोक अण्णा पांगारकर, सतीश जाधव, सोपान पेंढारकर, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, महेश निकम, संजय डोंगरे, प्रा.राजेंद्र भोसले, वैशाली बनसोड, पुष्पा मेत्रे, आशा भाले ,रेणुका बोटुळे, रेणुका फुलमामडीकर, विष्णू बापू डोंगरे, गोवर्धन कोल्हे, सिद्धेश्वर हाजबे अप्पा, सुनिल पवार, सुहास मुंडे, सोमेश काबलिये, इम्रान सय्यद, प्रशांत गाडे, सोमनाथ गायकवाड, कृष्णा गायके, ओम कळकुंबे, गणेश खरात, शाम उगले, राजाराम जाधव, गौरव गोधेकर तसेच रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गवारे व त्यांच्या आरोग्यसेविका व कर्मचारीवृंद कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले होते.

 

 

 

Previous article” देगलू तहसील कार्यालयात”. शिवसेनेचे “क्या हुआ तेरा वादा ‘” आंदोलन .
Next articleराष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.