आशाताई बच्छाव
” देगलू तहसील कार्यालयात”. शिवसेनेचे “क्या हुआ तेरा वादा ‘” आंदोलन .
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –भाजप प्रणित शासनाने लोकसभा व विधानसभा निवडणुकी पुर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी करणार, शेतकरी बांधवांना पिक विमा देणार, शेती मालाला योग्य भाव देणार , शेती उत्पादन वाढ करणार, खते व बियाणे, फवारणी औषध दर कमी करणार, शेतकऱ्यांना २४ तास विजय पुरवठा करणारे, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार, हर- घर – जल देणार, २५ लाख सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, नौकऱ्या देणार, ४५ हजार गावांना पाणंद रस्ते देणार, यासह बियाणे व खते यांची. चढ्या भावाने व बोगस, निकृष्ट दर्जाचे विक्री होत आहे यांची चौकशी करावी जाहीर नाम्यातील आश्वासन दिले होते पण निवडणुकी नंतर या आश्वासनचा विसर पडला आहे त्यामुळे याचा निषेध व या आश्वासनची आठवण करून देऊन भाजप जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाडा संपर्कप्रमुख तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख भुंजग पाटील यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक ५ जुन रोजी शासनाकडे तहसीलदार भरतसुर्यवंशी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, जिल्हा समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ वाडेकर, मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके, मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, उपतालुकाप्रमुख मानाजी पाटील लोणे, विभाग प्रमुख हाणमंत पाटील शिवणी कर, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद मिर सय्यद हनुमिया, मतदारसंघ प्रवक्ते सरपंच बालाजी चोपडे खुतमापुरकर,शहर संघटक भगवान जाधव, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार, युवा सेनेचे राहुल सोनकांबळे, विनोद सोनकांबळे,देगलूर शहर प्रमुख संजय अण्णा जोशी, शहर प्रमुख रविंद्र उल्लेवार, आदी शिवसेना पदाधिकारीसह असंख्य शेतकरी बांधव, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी शासनाच्या विरोधात व मागण्यांसाठी घोषणाबाजी करुन तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली






